भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक दिन तु एक दयाळू

ek din tu ek dayalu

रचनाकार: संत बोधले · अभंग
एक दिन तु एक दयाळू । दयाळू करितसे सांभाळ रात्रंदिवस ॥१॥ अनंत कोटी तुझ्या उपकाराच्या राशी । कोणापाशी तुजविण ॥ २ ॥ मी अंतरीची खूण तूचि एक जाणना । सांगो या अनंता कोणापाशी ॥३॥ एक मशक पडिलो तुझे द्वारी । लाज सर्वापरी आहे तुज ॥४॥ बोधला म्हणे देवा मी तुझा आखिला । दासाचा विकिला जन्मोजन्मी ॥५॥