भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक भाव दुजा न राहो मनीं । श्रीरंगावांचुनी दुजें नाहीं

ek bhav duja na raho manin | shrirangavanchuni dujen nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक भाव दुजा न राहो मनीं । श्रीरंगावांचुनी दुजें नाहीं ॥१॥ मनासी ते छंद आदर आवड । नामामृत चाड गोविंदाची ॥२॥ एका जनार्दनीं नाम वाचे गाऊं । आणिक न ध्याऊं दुजें कांहीं ॥३॥