भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक बाळ ब्रह्माचारी । एक उदास निर्विकारी

ek bal brahmachari | ek udas nirvikari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक बाळ ब्रह्माचारी । एक उदास निर्विकारी ॥१॥ एका शोभेंपाशुपत । एका सुदर्शन झळकत ॥२॥ एका करी पद्मगदा । एकपरशु वाहे सदा ॥३॥ ऐसे परस्परें ते दोघे । शोभताती ब्रह्मानंदें ॥४॥ एका जनार्दनीं ध्याऊं । तया चरणीं लीन होऊं ॥५॥