भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्वैताद्वैत विरहित गौळणी

dvaitadvait virahit gaulani

द्वैताद्वैत विरहित गौळणी ॥ अमृत दुडिया भारोनियां सांजवनींगे माये ॥ अभिन्नव करुनि श्रृंगारु माथाम गोरसाचा भारु । अजि निघाल्या विकरा करुं मथुरे हाटा ॥ प्रेम उचंबळलें चित्तीं हांसे चाले हंसगति । पुढें सखिया खेळती जिवीं जिवलगा ॥ दृष्टीं फ़िटला संदेहो लागे कांबळीचा सोवो । तंव माझरी कृष्णदेवो स्वरुपीं दिसे ॥१॥ नवलावगे नवलावगे देखियेला ॥२॥ दृष्टीं देखिला लोचनीं लाजिलीये विरोनि । मागति खुंटलिसे मनीं पांगुळलें ॥ सरलें नेत्रांचे देखणे श्रुतिश्रवण ऐकणें । चित्त चोरियलें कान्होनें चैतन्यींवो ॥ निमिषें खुणाविलें सहजें तव घडलें सहज । बिंबीं बिंबतसे निज हे जीव हाचि जाला ॥ आतां नाहीं मज जरी हा तंव बाहेरु भीतरी । अवघीं अंतरलीं दुरी गेलें मनुष्यपण ॥३॥ याचिये वो भेटी पडीली संसारासी तुटी । शब्द मावळला गोष्टी तो मी काय सांगों ॥ ऐसा कैसा हा दानी करुं नेदितां बोहणी । सुखासाठीं सांवजणी केलें रुपातीत ॥ आजि करुनी विकरा रिघु नुपुरे जाव्या घरां । नुरे कल्पनेसी थारा । सरले लिंग देह ॥ मी तंव वेंधलिये यासी सवेंचि जालिये तत्वमसि गुज लपवावें मानसीं तुम्ही सखीयांनो ॥४॥ याचिया लागल्या अभ्यासें गेलें मीपणाचें पिसें । केलें आपलिया ऐसें इंद्रियासहित ॥ पूर्ण चैतन्य भोगीलें हें तंव दुजें निमालें । देहीं अखंडित ठेलें होतें जैसें तैसें ॥ आलिंगुनिया अंतरीं रिगु नुपुरे बाहेरी । निर्विकाराच्या शेजारी प्रेम दुणावत ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलेसी भेटी । आजि संसारा संसटी घेऊनि गेला ॥५॥