भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुरुनि येक ऋण मागावया आलें

duruni yek run magavaya alen

दुरुनि येक ऋण मागावया आलें ॥ माझें मीं पाहिलें तंव कांही नाहीं ॥१॥ भीतरील माझीं पंचरत्नें नेलीं । स्वस्वरुप वाहवलीं मध्य गिळियेलें ॥२॥ निवृत्ति बोधें मी बोधलें ॥ सांगतें वाहवलें सर्वस्वेंसी ॥३॥ ऐसा रखुमादेविवरुविठ्ठलु आपण पुढारला । माझा निर्वाळा केला संसारींचा ॥४॥