भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्लभ नरदेह पावला । प्राणी देवासी विसरला

durlabh naradeh pavala | prani devasi visarala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुर्लभ नरदेह पावला । प्राणी देवासी विसरला ॥१॥ सुख मानिलें संसारी । जाऊनि पडीला अघोरीं ॥२॥ संसारसिंधुसी तारक । स्वामी दत्तराज एक ॥३॥ त्याचें नाम आठवितां । चुकली भवार्णवाची वार्तां ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । भवसिंधु तारक समर्थ ॥५॥