भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्जन तोचि पुढिलांचे सुख । देखोनियां दु:ख मनीं जीवीं

durjan tochi pudhilanche sukh | dekhoniyan du:kha manin jivin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
दुर्जन तोचि पुढिलांचे सुख । देखोनियां दु:ख मनीं जीवीं ॥१॥ तापल्या तेलीं पडतांचि शीतळ । जैसा उठी ज्वाळ भडका करी ॥२॥ पुढिलांचे उत्तम गुण । ऐकोनियां उत्थापन करुं धांवे ॥३॥ निळा म्हणे यातना त्यासी । केवीं नर्कावासीं नव्हती सांगा ॥४॥