भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुरि ना जवळी त्रिभुवनमंडळी

duri na javali tribhuvanamandali

दुरि ना जवळी त्रिभुवनमंडळी । ते मनाचा मुळीं बैसलेंसे ॥१॥ पाहतां न दिसे भानुप्रकाशें । येर्‍हवी तें असे मशकिं रया ॥२॥ बोलों जातां येणें जिव्हाचि खादली । पाहातां पाहातां नेली चर्मदृष्टी ॥३॥ दांतेविण जेणें स्थूळदेह खादले । शस्त्रेविण छेदिले लिंगदेह ॥४॥ त्त्वंपदिं सिध्द निवृत्ति लाधलें । गुरुलक्षीं लक्ष हारपलें ॥५॥ निवृत्तिदासा तुम्ही बहुत न बोला । रखुमादेविवरा ध्याइजेसु उगला ॥६॥