भजनी मालिका
← भजनांकडे परत

दु:खरूप देह दु:खाचा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें

du:kharup deh du:khacha sansar | sukhacha vichar nahin kothen

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
दु:खरूप देह दु:खाचा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥१॥ कन्या पुत्र बाळें सुखाचे सांगाती । दु:ख होतां जाती आपोआप ॥२॥ सोयरे धायरे कवणाचे कवण । अवघा वाटे शीण मना माझ्या ॥३॥ चोखा म्हणे अहो पंढरीनिवासा । सोडवी भवपाशा पासोनिया ॥४॥