भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुडिवरी दुडि साते निघाली

dudivari dudi sate nighali

दुडिवरी दुडि साते निघाली । गौळणी गोरसु म्हणों विसरली ॥१॥ गोविंद घ्यावो दामोदर घ्यावो । तव तव बोलती मथुरेच्या वो ॥२॥ गोविंद गोरसु एकचि नांवा । गोरसु विकूं आलें तुमच्या गांवा ॥३॥ बापरखुमादेविवर विठ्ठलेंसी भेटी । आपुले संवसाटी करुनि ठेला ॥४॥