भजनी मालिका
← भजनांकडे परत

दृष्टी पाहतां बिठोबासी । आनंद होय सुखराशी

drushti pahatan bithobasi | anand hoy sukharashi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दृष्टी पाहतां बिठोबासी । आनंद होय सुखराशी ॥१॥ ऐसा अनुभव मना । पाहें पाहें पंढरीराणा ॥२॥ एका दरुशनें मुक्ती । देतो रखुमाईचा पती ॥३॥ एका जनार्दनीं गमन । गोजिरें विटें समचरण ॥४॥