भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेव ज्ञानदेव वदतां वाचे । नाहीं कळिकाळाचें भेव जीवां

dnyanadev dnyanadev vadatan vache | nahin kalikalachen bhev jivan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्ञानदेव ज्ञानदेव वदतां वाचे । नाहीं कळिकाळाचें भेव जीवां ॥१॥ जातां अलंकापुर गांवीं । मोक्ष मुक्ति दावी वाट त्यासी ॥२॥ ब्रह्मज्ञान जोडोनी हात । म्हणे मी तुमचा अंकित ॥३॥ वाचे वदतां इंद्रायणी । यम वंदितो चरणीं ॥४॥ एका जनार्दनीं भावें । ज्ञानदेवा आठवावें ॥५॥