भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञान हेंचि गाय दुध दुहिलें भरणा दोही

dnyan henchi gay dudh duhilen bharana dohi

ज्ञान हेंचि गाय दुध दुहिलें भरणा दोही तया जना हातु नाहीं । ठेविलें अग्निवरी अग्नि नाहीं भीतरी । तापलें पडिभरी साय आली ॥१॥ गौळणी चतुरे झडकरी । जाय मथुरे विकरा करी ॥२॥ दहियामहियाविण घातलें विरजण । मांडिले घुसळण रवियेवीण । करिती मंथन वरी आलें जीवन । एकलें आणून काढूं पाहे ॥३॥ आलें गिर्‍हाईक । न विकी तूप ताक । नेणती विवेक । गोरसाचा ॥ दहियामहियाच्या करुनी घागरी । लटकी उंबरा उबरी । काय करुं ॥४॥ ज्ञान हे घागरी । वाईयेली शिरीं । गोरसभीतरीं दाखवितो । एके हातें सावरी । झाकी तया वरी । चोखटिव करी । गोरसाची ॥५॥ तंव मार्गी जातां । एकी पुसे गौळणी । पारि बैसले दानीं किं । नाहीं वो । त्यासी नेदीं मी दान । जाईन मी आपण । प्रत्यक्षा प्रमाण । काय करुं ॥६॥ ऐसी पाराजवळी गेली । तंव शब्दें वोळखिली । जावों दे गा वहिली । उसिरु जाला ॥ या निर्वाणींच्या बोला । सुखिया संतोषला । निरोप दिधला । गौळणीसी ॥७॥ ऐसी पावली मथुरा । क्षण न लगे विकरा करा । सवेंचि एकसरा । उफ़खा झाला ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु ग्राहिक मानसीं गोरसु ज्ञानेंसि । मिळोनि गेला ॥८॥