भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिसे सगुण हा स्वरुपसुंदर । परि व्यापूनियां ठेला चराचर । देवादानचादि मानव असुर । याविण उरला ऐसा नाहीं तृणांकुर वो

dise sagun ha svarupasundar | pari vyapuniyan thela charachar | devadanachadi manav asur | yavin urala aisa nahin trunankur vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
दिसे सगुण हा स्वरुपसुंदर । परि व्यापूनियां ठेला चराचर । देवादानचादि मानव असुर । याविण उरला ऐसा नाहीं तृणांकुर वो ॥१॥ ऐशा गौळणी त्या अनुवाद करिती ज्या ज्या रंगलिया याच्या अनुवृत्ती । रजनीं दिवो जयां याचीचि संगती । त्या त्या स्वानुभवें आपुल्या बोलती वो ॥२॥ महि अंबु तेज मारुत गगन । जगा बीजरुप हाचि वो लपोन महदमायेचें हा अनादि कारण । देवत्रयासी हा मूळ अधिष्ठान हो ॥३॥ आपुल्याचि गुणी । उरला भरोनियां चाही वाणी खाणी । ज्या परि हा तैसाचि साजणी । रुपें गुणे क्रिया मंडित भूषणीं वो ॥४॥ भुवनें चतुर्दश तींहि याच्या पोटीं । स्वर्गी एकविसाहि आदि हा शेवटीं । होण्या न होण्याच्या नेणोनियां गोठी । आपीं आपणचि एकट एकटी ॥५॥ निळा म्हणे आम्हीं नेणोनियां अबळा । हासों रुसों यासी करुं गदारोळा । खेळतां खेळ यासी भांडों वेळोवेळां । केले अपराध ते मागों या गोपाळा वो ॥६॥