भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीपप्रकाश दीपीं सामावला कळिके

dipaprakash dipin samavala kalike

दीपप्रकाश दीपीं सामावला कळिके सामावाली ज्योति । ज्योति सामावोनि बिंब हारपलें तैसी जाली सहज स्थिति । संचित प्रारब्ध दग्ध पटन्यायें हे दृश्यभ्रांति देहो जावो अथवा राहो फ़िटला संदेहो मृतिकेचि कायासि खंति ॥१॥ रुप पाहोनिया दर्पण ठेलें शेखीं अभास दृष्टि राहिला । न पाहतां मुख जाणें तो आपण तैसा अनुभव जाला रया ॥२॥ या प्रपंचाचे कवच सांडुनि बाहेरि । अविद्या दृश्य संहारी । पदीं पद ग्रासुनि ठेलें जें बुडोनि राहिलें अंतरी । चैतन्याचें मुसें हेलावत दिसे जेवि तरंगुसागरीं । कूर्माचिये परि आंगचि आवरि तो स्थिर जाला चंद्र करि रया ॥३॥ तेथें जाणणें निमालें बोलणें खुंटलें जेवि जीवनीं जीवन मिळाले । दश दिशा भरुनि दाटलें किं सुख सुखासि भेटो आले । ज्ञानदेव म्हणे आम्हा जितांचि मरणें । कीं कोटी विकल्प जिणें ऐसें निवृत्तीनें केलें रया ॥४॥