भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिप दिगांतरीं दिपीं पाहातां

dip digantarin dipin pahatan

दिप दिगांतरीं दिपीं पाहातां । परेहुनि परता तो देखिला वो माय ॥१॥ पाहीन मी आतां निरंजन स्वरुपता । त्यानें मज तत्त्वतां चोजविलें वो माय ॥२॥ देहाचा दिवा उजळुनि ज्ञानज्योति । परपुरुषीं निवृत्ति झाली वो माय ॥३॥ कवळुनि भेटी प्राणेंसि देईन मिठी । मी नि:शब्देंसी गोष्टी सांगेन वो माय ॥४॥ निजभावें निरोपिला सच्चिदानंदपदीं । मग मज परमानंदी गोष्टी जोडली वो माय ॥५॥ ऐसें मीं अनुसरलें यानें आपंगिलें । रखुमादेविवरु विठ्ठलें वो माय ॥६॥