भजनी मालिका
← भजनांकडे परत

धीट अधिकार कापिले

dhit adhikar kapile

रचनाकार: संत निळोबा · अभंग
धीट अधिकार कापिले । बधिर बोलिके तोतिरे ॥१॥ भाविकांचा गोडा भावो । देखोनि सर्वे नाचे देवो ॥२॥ म्हणे धन्य तुमचें कर्म । अवघें माझेचि ठाईं प्रेम ॥३॥ निळा म्हणे तुम्हांविण । दुजें आप्त मज तें कोण ॥४॥