भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरिती ज्या हातीं संत कृपावंत । पाळी पंढरीनाथ लळा त्याचा

dhariti jya hatin sant krupavant | pali pandharinath lala tyacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
धरिती ज्या हातीं संत कृपावंत । पाळी पंढरीनाथ लळा त्याचा ॥१॥ न विसंबे त्या घडी पळ युग मानी । दिसों नेदी जनीं किविलवाणें ॥२॥ पाजी प्रेमपेहे वाह तया अंकी । म्हणे हे लाडकीं तान्हीं माझीं ॥३॥ निळा म्हणे दावी स्वहिताचा पंथ । नेदी त्यां आघात येऊं आड ॥४॥