भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरिला देव आवाडी मिठी । नोहे तुटी जन्मोजन्मीं

dharila dev avadi mithi | nohe tuti janmojanmin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धरिला देव आवाडी मिठी । नोहे तुटी जन्मोजन्मीं ॥१॥ हाचि मुख्य भाव साचा । तुटला जन्माचा विसर ॥२॥ एकपणें पाहतां पोटीं । एका जनार्दनीं जाहली भेटी ॥३॥