भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरसी संसारासी हांव । माझें माझें म्हणशी सर्व । हें तंव कोणाचें वैभव । तुज न कळे पामरा

dharasi sansarasi hanv | majhen majhen mhanashi sarva | hen tanv konachen vaibhav | tuj na kale pamara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धरसी संसारासी हांव । माझें माझें म्हणशी सर्व । हें तंव कोणाचें वैभव । तुज न कळे पामरा ॥१॥ आयुष्यमान जंव आहे । तंव सर्वा होशी साह्म । अंतकाळीं जंव आहे । तंव सर्वा होशी साह्म ॥२॥ तुज जे म्हणती उत्तम । त्यांचा तुज मोठा भ्रम । अंतकांळीं पावशी श्रम । एकलाचि पामरा ॥३॥ म्हणोनि सर्व भावें हरी । स्मरण करी निरंतरीं । एका जनार्दनीं निर्धारी । नाम स्मरे वेळोवेळां ॥४॥