भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य माझे भाग्य पूर्व पूण्ये फळासी आले

dhanya majhe bhagya purva punye phalasi ale

रचनाकार: संत बोधले · अभंग
धन्य माझे भाग्य पूर्व पूण्ये फळासी आले। तरिच आवडले तुमचे सुख ॥१॥ ऐसे बोल वो रुखमिणी । बहुत दिस होत माझे मनी ॥ २॥ जे चिंतित होतो आंतकरणी । ते फळासी आले ॥३॥ की तुम्हासारिखा ना हो मजलागी । सोहोळा हा घ्यावा निज गुह्याचा ॥४॥ काय सांगो आता सुखाची आवडी । देखोनी मन माझे ओढी तुमच्या पायी ॥५॥ न करिता क्लेश पावले अवचिता । हे कृपा भगवंता केली मज ॥ ६॥ बोधला म्हणे पूर्व भाग्ये पडिली मिठी । आता सांगसिल गोष्टी आंतरीच्या ॥७॥