भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य हरिहर भवभयाहर । आठव सत्वर करीं मना

dhanya harihar bhavabhayahar | athav satvar karin mana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य हरिहर भवभयाहर । आठव सत्वर करीं मना ॥१॥ तयांच्या चिंतनीं हरतील दोष । नित्य होय वास वैकुंठासी ॥२॥ नारदादि संता करावें नमन । धरावे चरण हृदयकमळीं ॥३॥ एका जनार्दनीं संतचरण ध्यातां । मुक्ति सायुज्यता हातं येते ॥४॥