भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य सदगुरुराणा । दाखिविलें ब्रह्मा भुवना

dhanya dhanya sadagururana | dakhivilen brahma bhuvana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य धन्य सदगुरुराणा । दाखिविलें ब्रह्मा भुवना ॥१॥ उपकार केला जगीं । पावन जालों आम्हीं वेगीं ॥२॥ पंढरीं पाहतां । समाधान जाले चित्ता ॥३॥ वेटेवरी समचरण । एका जनार्दनीं निजखुण ॥४॥