भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य पंधरपुर । वाहे भीवरा समोर

dhanya dhanya pandharapur | vahe bhivara samor

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य धन्य पंधरपुर । वाहे भीवरा समोर ॥१॥ म्हणोनि नेमें वारकरी । करती वारी अहर्निशीं ॥२॥ पुडलीकां दंडवत । पाहाती दैवत श्रीविठ्ठल ॥३॥ काला करती गोपाळापुरी । मिळोनि हरी सवंगडे ॥४॥ तया हरिदासाचे रजःकण शरण एका जनार्दन ॥५॥