भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य निवृत्तिदेवा । काय महिमा वर्णावा

dhanya dhanya nivruttideva | kay mahima varnava

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य धन्य निवृत्तिदेवा । काय महिमा वर्णावा ॥१॥ शिव अवतार तूंचि धरुन । केलें त्रैलोक्य पावन ॥२॥ समाधि त्र्यबंक शिखरीं । मागें शोभे ब्रह्मगिरी ॥३॥ निवृत्तिनाथाचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥