भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य नामदेव । सर्व वैष्णवांचा राव

dhanya dhanya namadev | sarva vaishnavancha rav

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य धन्य नामदेव । सर्व वैष्णवांचा राव ॥१॥ प्रत्यक्ष दाविली प्रचीत । वाळुवंटीं परीस सत्य ॥२॥ कवित्व केलें शतकोटी । तारिले जीव कल्पकोटी ॥३॥ देव जेवीं सवें । ऐशी ज्याची देवासवें ॥४॥ धन्य धन्य नामदेवा । एका जनार्दनीं चरणीं ठेवा ॥५॥