भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य आजी डोळां । स्मामी निवृत्ति देखिला

dhanya aji dolan | smami nivrutti dekhila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य आजी डोळां । स्मामी निवृत्ति देखिला ॥१॥ कुशावर्ती करुं स्नान । घेऊं निवृत्तिदर्शन ॥२॥ प्रदक्षिणा ब्रह्मगिरी । चौ‍‍‍‍र्‍यांयशीची चुकली फ़ेरी ॥३॥ गंगाद्वारीं स्नान करतां । हारे पय पान व्यथा ॥४॥ ऐसीं तीन अक्षरें । एका जनार्दन स्मरे ॥५॥