भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य आज दिन संतदरुशनाचा । अनंत जन्मांचा शीण गेला

dhanya aj din santadarushanacha | anant janmancha shin gela

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य आज दिन संतदरुशनाचा । अनंत जन्मांचा शीण गेला ॥१॥ मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्याचे ॥२॥ त्रिविध तापांची जाहली बोळवण । देखिल्या चरण वैष्णवांचे ॥३॥ एका जनार्दनीं घडो त्यांचा संग । न व्हावा वियोग माझ्या चित्ता ॥४॥