भजनी मालिका
← भजनांकडे परत

धांवुनीं तिजी गोपिका म्हणे वो बाई । येथें रहावया लाग उरला नाहीं

dhanvunin tiji gopika mhane vo bai | yethen rahavaya lag urala nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धांवुनीं तिजी गोपिका म्हणे वो बाई । येथें रहावया लाग उरला नाहीं ॥१॥ जात होतें पाण्यां यमुने पहाटीं । अविचित येऊनियां पाठी थापटी ॥२॥ एका जनार्दनीं आणियला त्रास । नको हें गोकुळ आम्हीं जाऊ मथुरेस ॥३॥