भजनी मालिका
← भजनांकडे परत

धांवोनि मी येतो परि नेणें मारग । तूंचि लागवेग करीं आतां

dhanvoni mi yeto pari nenen marag | tunchi lagaveg karin atan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
धांवोनि मी येतो परि नेणें मारग । तूंचि लागवेग करीं आतां ॥१॥ अनाथ मी दीन रंक शरणांगत । म्हणूनियां त्वरित सांभाळावें ॥२॥ अहो दीनानाथा दीनबंधु देवा । मनींचा हा उगवावा हेत माझा ॥३॥ तुम्हां तों येविशीं न लगती सायास । प्रगटावया दिवस मास पळ ॥४॥ मी तों सर्वभावें आहे बुध्दिहीन । नेणें करुं ध्यान स्तवन पूजा ॥५॥ निळा म्हणे तुम्ही कृपेचे सागर । जाणता अंतर सर्वसाक्षी ॥६॥