भजनी मालिका
← भजनांकडे परत

धांव नारायण । माझ्या दुःखाच्या निरसना

dhanv narayan | majhya duhkhachya nirasana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धांव नारायण । माझ्या दुःखाच्या निरसना ॥१॥ संसारें मी कष्टलों । तुजलागीं शरण आलों ॥२॥ कोण सोडवील आतां । तुजविन जी अनंता ॥३॥ तूचि मायबापा । निवारिसी सर्व तापा ॥४॥ एका जनार्दनीं पाय । धरुनियां चित्तीं राहे ॥५॥