भजनी मालिका
← भजनांकडे परत

धांव घाली विठु आतां चालुं नको मंद । मज मारिती बडवे कांहीतरी अपराध

dhanv ghali vithu atan chalun nako mand | maj mariti badave kanhitari aparadh

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
धांव घाली विठु आतां चालुं नको मंद । मज मारिती बडवे कांहीतरी अपराध ॥१॥ विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला । शिव्या देऊनी मारा म्हणती देव कां बाटला ॥२॥ तुमचे दारीचा कुतरा नका मोकलूं दातारा । अहो चक्रपाणी तुम्ही आहां जीमेदारा ॥३॥ कर जोडोनी चोखा विनवितो देवा । बोलिलो उत्तर याचा राग नसावा ॥४॥