भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन वित्त आशा धरुनी स्मरती । तेही मुक्त होती विठ्ठलनामें

dhan vitta asha dharuni smarati | tehi mukta hoti viththalanamen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन वित्त आशा धरुनी स्मरती । तेही मुक्त होती विठ्ठलनामें ॥१॥ प्रपंच परमार्थ धरुनियां हाव । गाती विठ्ठल देव आवडीनें ॥२॥ तरती तरले हाचि भरंवसा । एका जनार्दनीं ठसा विठ्ठलनाम ॥३॥