भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन मानबळें नाठविसी देवा । अंतकाळीं तेव्हा कोण आहे

dhan manabalen nathavisi deva | antakalin tevha kon ahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन मानबळें नाठविसी देवा । अंतकाळीं तेव्हा कोण आहे ॥१॥ यमाचे ते दंद बैसतील माथां । मग तुज रक्षितां कोण आहे ॥२॥ माता पिता बंधु सोइरे धाईरे । जोंवरी इंद्रियें चालताती ॥३॥ सर्वस्व कामिनी म्हणविसी कांता । ती ही केश देतां रडुं लागे ॥४॥ एका जनार्दनीं जातांचि शरण । स्वप्नीं जन्ममरण नाहीं नाहीं ॥५॥