भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवकी म्हणे बाळा धन्ये भाग्य जाले

devaki mhane bala dhanye bhagya jale

रचनाकार: संत बोधले · अभंग
देवकी म्हणे बाळा धन्ये भाग्य जाले । धन्ये उदरा आले परब्रह्म ॥१॥ धन्य माझे आता निवती दृष्टी डोळे । धन्ये कडिये खेळे कृष्णु बाळ ॥२॥ जन लोक बोलती देवकीचा बाळ । धन्ये उभयता कुळ उद्धरिले ॥३॥ धन्ये हे भूमीस्थळ धन्ये हे गोकुळ । धन्ये ते गोपाळ सदा सांग ॥४॥ धन्ये पावा मोहरी वाहुनिया खाद्यांवरी । धन्ये भिमातिरीं क्रीडा करी ॥५॥ बोधला म्हणे हरी देखिले दृष्टी । धावोनिया मिठी घाली पायीं ॥६॥