भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचिया द्वारीं उभा क्षणभरी

devachiya dvarin ubha kshanabhari

देवाचिया द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरिमुखें म्हणा ॥२॥ पुण्याची गणना कोण करि ॥३॥ असोनि संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदां ॥४॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणें । द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥५॥