भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा कां हें साकडें घातिलें । निवारा हें कोडें माझें तुम्ही

deva kan hen sakaden ghatilen | nivara hen koden majhen tumhi

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
देवा कां हें साकडें घातिलें । निवारा हें कोडें माझें तुम्ही ॥१॥ समर्थे आपुल्या नामासी पाहावें । मनीं उमजावें आपुलिया ॥२॥ यातिहीन आम्हां कोण अधिकार । अवघे दूरदूर करिताती ॥३॥ चोखा म्हणे ऐसा हीन नरदेह । पडिला संदेह काय करूं ॥४॥