भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा भक्तांचा सोहळा । वाचें गाती वेळोवेळां

deva bhaktancha sohala | vachen gati velovelan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देवा भक्तांचा सोहळा । वाचें गाती वेळोवेळां ॥१॥ म्हणती धन्य पंढरपुर । पुंडलीक मुनीश्‍वर ॥२॥ चंद्रभागा पदयतीर्थ । वेणुनादीं जन कृतार्थ ॥३॥ निळा म्हणे पांडुरंगा । भेटी तापत्रयभंगा ॥४॥