भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव जाला पाठींपोटीं । तया नाहीं आटापाटी

dev jala pathimpotin | taya nahin atapati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव जाला पाठींपोटीं । तया नाहीं आटापाटी ॥१॥ जेथें जाय तेथें देव । नाहीं भेव सर्वथा ॥२॥ संसारासी मारुनी लाथा । केला तत्त्वतां देशोधडी ॥३॥ विषयांचें ठेचिलें तोंड । मोडिलें बंड पांचाचें ॥४॥ जनार्दनाचा एक म्हणे । देवा पाहणें पाठींपोटीं ॥५॥