भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव हांसोनि बोलती । नको येऊं काकुलती

dev hansoni bolati | nako yeun kakulati

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देव हांसोनि बोलती । नको येऊं काकुलती ॥१॥ आम्ही रंजवु आपणीयां । तुझिये वाचे चेतवूनियां ॥२॥ नलगें कांहीं परिहार । देणें तुज धरीं धीर ॥३॥ निळा म्हणे चरणांवरी माथा । ठेवूनी करी पुढें कथा ॥४॥