भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव देव म्हणुनी व्यर्थ का फिरशी

dev dev mhanuni vyartha ka phirashi

देव देव म्हणुनी व्यर्थ का फिरशी । निजदेव नेणशी मुळीं कोण ॥१॥ देवा नाहीं रूप देवा नाही नांव । देवा नाही गांव कोठें कांहीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा । अखंडित सेवा करा त्याची ॥३॥