भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव चालिला सांगातें । भक्त जाती ज्या ज्या पंथे

dev chalila sangaten | bhakta jati jya jya panthe

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देव चालिला सांगातें । भक्त जाती ज्या ज्या पंथे ॥१॥ परम आनंद उभयतांसी । देवभक्तां सुखाच्या रासी ॥२॥ चालतां मारगीं । कथा कीर्तन प्रसंगीं ॥३॥ निळा म्हणे देवभक्तां । परमविश्रांती चालतां ॥४॥