भजनी मालिका
← भजनांकडे परत

देउनी भातुकें । पुढें नाचवी कौतुकें

deuni bhatuken | pudhen nachavi kautuken

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देउनी भातुकें । पुढें नाचवी कौतुकें ॥१॥ हांसोनियां नवल करी । कृपादृष्टी तयावरी ॥२॥ बोबडें बोलणें । त्याचें म्हणे कोडिसवाणें ॥३॥ निळा म्हणे प्रीति करी । खेळविला उरावरी ॥४॥