भजनी मालिका
← भजनांकडे परत

देउळा आधीं कळसु वाईला

deula adhin kalasu vaila

देउळा आधीं कळसु वाईला । पाहोनि गेलो आपुले दृष्टी ॥१॥ विपरीतगे माये देखियेलें । कांसविचें दूध दोहियलें ॥२॥ आधीं पुत्रपाठी वांझ व्याली । लेणें लेऊनि ठेले साडेपंधरें ॥३॥ बापरखुमादेविवरु विपरीत सुपरीत जाणें । संत तिये खुणें संतोषतील ॥४॥