भजनी मालिका
← भजनांकडे परत

देतो मोक्ष मुक्ति वाटितसे फुका । ऐसा निश्चयो देखा करुनी ठेलो

deto moksha mukti vatitase phuka | aisa nishchayo dekha karuni thelo

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देतो मोक्ष मुक्ति वाटितसे फुका । ऐसा निश्चयो देखा करुनी ठेलो ॥१॥ सांवळें रुपडें गोजिरें गोमटें । उभें पुडंलीके पेठें पंढरीये ॥२॥ वाटितसे इच्छा जयासी जे आहे । उभारुनी बाह्म देत असे ॥३॥ एका जनार्दनीं देतां न सरे मागे । जाहली असतीं युगें अठ्ठावीस ॥४॥