भजनी मालिका
← भजनांकडे परत

देतां शिव्या हांसो लागे । निंदा श्लाघ्ये ऐकोनी

detan shivya hanso lage | ninda shlaghye aikoni

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देतां शिव्या हांसो लागे । निंदा श्लाघ्ये ऐकोनी ॥१॥ करिती त्यांचे असघेंचि गोड । करुनि कोड स्वीकारी ॥२॥ जेवितां देती उष्टावळी । घाली कवळी मुखींचि त्या ॥३॥ निळा म्हणे धणीवरि धाले । म्हणे मी पावलों पाहुणेर ॥४॥