भजनी मालिका
← भजनांकडे परत

देतां काहींचि न घेती । संत उदासीन चित्तीं

detan kahinchi na gheti | sant udasin chittin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देतां काहींचि न घेती । संत उदासीन चित्तीं ॥१॥ त्रैलोक्यींचा मानधन । नावडे तयां देवाविण ॥२॥ नाहीं आस्था देहावरी । आशा तृष्णा कैंची उरी ॥३॥ निळा म्हणे ते देवचि झाले । कल्पकल्पांतीं संचले ॥४॥