भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखोनिया हरलिंग । जो न करी तया साष्टांग

dekhoniya haraling | jo na kari taya sashtang

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देखोनिया हरलिंग । जो न करी तया साष्टांग ॥१॥ मुख्य तोचि वैरी । स्वमुखें म्हणतसे हरी ॥२॥ व्रत न करी शिवरात्र । कासयानें होती पवित्र ॥३॥ ऐशियासी यमपुरी । एका जनार्दनीं निर्धारीं ॥४॥