भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखती तें विठ्ठल रुप । वाचें विठ्ठल नामजप

dekhati ten viththal rup | vachen viththal namajap

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देखती तें विठ्ठल रुप । वाचें विठ्ठल नामजप ॥१॥ तेहि विठ्ठल झाले अंगें । मोहममताविषयत्यागें ॥२॥ विठ्ठल कीर्ति लेइले अंगीं । विठ्ठल झाले भोगीं त्यागीं ॥३॥ निळा म्हणे विठ्ठल झाले । व्दैतभावातें मुकले ॥४॥