भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहधर्मी काज गुरुराज चित्तीं

dehadharmi kaj gururaj chittin

देहधर्मी काज गुरुराज चित्तीं । तरीच या संपत्ती फ़ळद होती ॥१॥ तैसें तुझें ध्यान करितां उध्दट । सांपडली वाट वैकुंठीची ॥२॥ ज्ञेय ज्ञाता ज्ञान ध्येय ध्याता हरी । समरसें श्रीहरि तत्त्व जाले ॥३॥ पृथ्वी आप तेज गगनाकृति वायो । फ़िटला संदेहो ये जन्मींचा ॥४॥ उपदेश द्रष्टा जरि असे श्रेष्ठ । तरीच भाग्य विनट विष्णुरुपी ॥५॥ ज्ञानदेवीं सिध्दि साउली श्रीहरी । गुरुकृपा करीं कुरवाळिलें ॥६॥